Rashmi Mane
चीनच्या तियानजिन शहरात सोमवारी सकाळी एससीओ शिखर परिषदेत मोठं ऐतिहासिक दृश्य पाहायला मिळालं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची भेट झाली.
या भेटीच्या फोटोंमध्ये पीएम मोदी सेंटरमध्ये दिसले तर पुतिन आणि जिनपिंग यांच्या सोबत दिसले.
पीएम मोदींनी आपल्या X (ट्विटर) अकाउंटवर फोटो शेअर करत लिहिलं "तियानजिनमध्ये चर्चेला सुरुवात! पुतिन आणि जिनपिंग यांच्यासोबत विचारांची देवाण-घेवाण."
या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. जगभरातील लोकांचं लक्ष या तीन नेत्यांच्या भेटीकडे वळलं आहे.
उद्घाटन समारंभात शी जिनपिंग यांनी जागतिक घडामोडींवर भाष्य केलं. त्यांनी धमकावणाऱ्या देशांवर टीका केली.
एससीओ देशांची संयुक्त अर्थव्यवस्था जवळपास 30 ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचली आहे. चीनचा या देशांमध्ये आधीच 84 अब्ज डॉलर पेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे.