Ganesh Sonawane
महापौरावर भ्रष्टाचाराचा डाग नसावा, कारण तो संपूर्ण शहराचा विश्वासाचा चेहरा असतो. भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर भूमिका घेणारा असावा. शिक्षीत व सुसंस्कृत असावा.
सामान्य नागरिक सहज भेटू शकेल, अशी वागणूक व उपलब्धता महापौरात असली पाहिजे. लोकांच्या समस्या ऐकणारा, तक्रारींवर प्रतिसाद देणारा आणि पारदर्शक संवाद ठेवणारा महापौर हवा.
दबाव, आंदोलन किंवा राजकीय विरोध असूनही शहरहिताचे निर्णय घेण्याची हिंमत असावी.
पूर, महामारी, अपघात किंवा आपत्तीत महापौर पुढे येऊन जबाबदारी घेतो का हे महत्त्वाचे.
महापौर फक्त आपल्या पक्षाचा नसून संपूर्ण शहराचा प्रतिनिधी असतो.
फक्त आदेश नव्हे तर कामाची स्पष्ट दिशा देणारा नेता हवा. अधिकाऱ्यांकडून वेळेत काम करून घेता यायला हवे.
चूक झाली तर कारणे न देता ती दुरुस्त करण्याची मानसिकता असावी. महापालिकेचे अधिकार, नियम व कायदे माहित असावे नाही तर चुकीचे निर्णय होण्याचा धोका वाढतो.
पाणी, रस्ते, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता यांना प्राधान्य
झोपडपट्टी पुनर्वसन व सर्वसमावेशक विकास.