Idi Amin Story : 5 लाख माणसांची हत्या घडवणाऱ्या क्रूरकर्मा हुकूमशहा ईदी अमीनची कहाणी!

Chetan Zadpe

क्रूरकर्मा हुकूमशहा -

युगांडाचा ईदी अमीन हा आधुनिक जगातला सर्वात क्रूरकर्मा हुकूमशहा म्हणून ओळखला जातो. त्याच्या राजवटीत 5 लाखे लोकांची हत्या घडवल्याचे काही मानवाधिकार गटांच्या अहवालात दावा करण्यात आला आहे.

भारतीयांना युगांडा सोडावा लागला -

युगांडावर राज्य करत असताना ईदी अमीनने असा आदेश दिला की, तेथील अनिवासी भारतीयांना मोठा धक्का बसला. जवळपास 80 हजार भारतीय वंशाच्या लोकांना युगांडा सोडावा लागला.

क्रूरतेच्या सीमा ओलांडल्या -

अवघ्या आठ वर्षांच्या सत्ताकाळात अशी क्रूरता जगाच्या इतिहासात आढळत नाही. एका सामान्य लष्करी अधिकाऱ्यापासून युगांडाच्या सत्तेवर आलेल्या इदी अमीनने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.

युगांडावर आशियाई लोकांचे वर्चस्व -

ईदी अमीनच्या राजवटीपूर्वी युगांडावर केवळ भारतीयांचेच नव्हे तर आशियाई लोकांचेही वर्चस्व होते. दुसऱ्या देशातून आलेले असूनही युगांडाच्या अर्थव्यवस्थेवर या आशियाई लोकांचे वर्चस्व होते.

युगांडा सोडण्याचे आदेश -

आशियाई लोकांविरुद्धच्या अंतर्गत बंडाची आगही संपूर्ण युगांडामध्ये धगधगत होती. याच रोषाचा फायदा उठवत आशियाई लोकांना ताबडतोब युगांडा सोडण्याचे आदेश अमीनने दिले.

भारतीय युगांडात कसे पोहोचले?

युगांडामध्ये भारतीयांचा संबंध गुलामगिरीशी जोडला जातो. ब्रिटीश सत्ताकाळात भारतीयांना युगांडात नेले. कालांतराने तिकडचे भारतीय युगांडातच स्थायिक झाले होते.

मृत्यू -

1979 मध्ये जेव्हा टांझानिया आणि इदी अमीनच्या विरोधी सैन्याने हातमिळवणी केली तेव्हा अमीन सौदी अरेबियाला पळून गेला. या क्रूर हुकूमशहाचा 2003 साली तिथेच मृत्यू झाला. 1971 त 1979 पर्यंत त्याने युगांडावर सत्ता चालवली.

NEXT : 'झारखंड टायगर' असणार नवे मुख्यमंत्री, कोण आहेत चंपई सोरेन?

क्लिक करा...