सरकारनामा ब्यूरो
भाजपचे सदस्य राहुल नार्वेकर हे विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. याच पाश्वभूमीवर महाराष्ट्रातील आतापर्यतचे अध्यक्ष कोण होते ते पाहूयात..
मधुकरराव चौधरी यांची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात गांधीवादी नेता म्हणून केली जाते. 21 मार्च 1990 ते 22 मार्च 1995 या कालावधीत त्यांची नियुक्ती महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी करण्यात आली होती.
शिवसेनेत बाळासाहेबांचे विश्वासू नेते म्हणून दत्ताजी नलावडे यांची ओळख होती. मुंबईचे महापौर त्यानंतर 24 मार्च 1995 मध्ये विधानसभेचे अध्यक्ष असा त्यांनी कार्यभार पाहिला.
अरुण गुजराथी हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते. 22 ऑक्टोबर 1999 मध्ये त्यांची नियुक्ती महाराष्ट्राचे 10 वे विधानसभा अध्यक्ष म्हणून करण्यात आली.
बाबासाहेब कुपेकर यांची नियुक्ती 6 नोव्हेंबर 2004 ला विधानसभा अध्यक्ष म्हणून करण्यात आली. त्यांनी एकूण 4 वर्ष 362 दिवस इतक्या कालावधीसाठी कार्यभार पार पाडला. कुपेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विश्वासू नेते होते.
दिलीप वळसे पाटील यांनी 1999 ते 2009 पर्यंत महाराष्ट्राचे गृहमंत्री त्याचबरोबर वित्त, योजना, ऊर्जा, शिक्षणमंत्री म्हणून काम केले. 2009 ला त्यांची निवड विधानसभा अध्यक्षपदी झाली. तब्बल पाच वर्षे त्यांनी विधानसभेचे कामकाज पहिले.
भाजपचे हरिभाऊ बागडे यांची नियुक्ती 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी करण्यात आली. 2019 मध्ये ते निवृत्त झाले. आता ते राजस्थानचे राज्यपाल आहे.
काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले यांची नियुक्ती 1 डिसेंबर 2019 ला विधानसभेचे अध्यक्ष म्हणून करण्यात आली. त्यांनी केवळ 1 वर्ष 65 दिवस इतका कार्यभार सांभाळला.
2022 ते 2024 पर्यत नार्वेकरांनी विधानसभेचा कार्यभार पार पाडला. 9 डिसेंबर 2024 ला दुसऱ्यांदा त्यांची नियुक्ती विधानसभेच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे.