SPG security in India : पाकिस्तानाच्या पंतप्रधानांना कोण पुरवते सुरक्षा? भारताच्या PM साठी आहे खास व्यवस्था!

सरकारनामा ब्यूरो

पंतप्रधानांची सुरक्षा

देशाच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची सुरक्षा ही एक मोठी जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी पार पाडणे प्रत्येक देशासाठी खूप म्हत्त्वाचे असते.

Narendra Modi | Sarkarnama

कोणत्या एजन्सी मार्फत सुरक्षा?

देशात सुरक्षा एजन्सी NSG, ITBP आणि CRPF प्रमाणे SPG ही सुद्धा एक सुरक्षा एजन्सी आहे. देशाच्या महत्त्वाच्या पदांवर असलेल्या सुरक्षा व्यक्तींना त्यांच्या मार्फत सुरक्षा देण्याचे काम करण्यात येते.

SPG security in India | Sarkarnama

एसपीजी

पंतप्रधानांच्या सुरक्षतेची जबाबदारी ही एसपीजीकडे (Special Protection Group) असून, पंतप्रधानांच्या सुरक्षततेमध्ये कोणतेही चूक झाल्यास त्यासाठी एसपीजी जबाबदार असतात.

SPG security in India | Sarkarnama

एसटीएफ

1981च्या आधी भारताच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलिसांच्या पोलिस उपायुक्तांना दिली होती. यानंतर सुरक्षेसाठी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ)ची स्थापना करण्यात आली. 

SPG security in India | Sarkarnama

कधी झाली स्थापना?

1984 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर, 1985 मध्ये एक विशेष युनिटची (एसपीजी) स्थापन करण्यात आली.

SPG security in India | Sarkarnama

कशी देतात सुरक्षा?

एसपीजी कमांडो पंतप्रधानांना चार थरांचे संरक्षण देत असतात. त्याच्याकडे स्वयंचलित बंदूक आणि एक पिस्तूल देखील असते. त्यांना फिजिकल, शूटिंग, वॉर, प्रॉक्सिमिटी प्रोटेक्शन (क्लोज सिक्युरिटी स्ट्रॅटेजी) चे विशेष प्रशिक्षण दिले जाते.

SPG security in India | Sarkarnama

पाकिस्तानातील एसएसजी कमांडो

पाकिस्तानमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एसएसजी कमांडो आहेत. येथील एसएसजीची तुलना अनेकदा भारताच्या पॅरा-एसएफशी केली जाते.

SPG security in India | Sarkarnama

पाकिस्तानी सैन्यातील युनिट-

एसएसजी बद्दल सांगायचे झाले तर, ते पाकिस्तानी सैन्यातील एक विशेष ऑपरेशन युनिट आहे. या युनिटला ब्लॅक स्टॉर्क्स आणि मरून बेरेट्स असेही म्हणतात.

SPG security in India | Sarkarnama

कोणत्या देशाशी केली जाते तुलना?

अहवालांनुसार, एसएसजीची तुलना अमेरिकन आर्मी स्पेशल फोर्सेस आणि ब्रिटिश आर्मीच्या एसएफएसजीशी केली जाते. हे सैन्य शस्त्राशिवायही लढण्यात एक्सपर्ट आहेत.

SPG security in India | Sarkarnama

NEXT : नेत्यांसह अभिनेत्यांनी गाजवले मैदान; एकनाथ शिंदे, सुप्रिया सुळे अन् सलमानची हजेरी..

येथे क्लिक करा...