सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधानांच्या 'टीबी मुक्त भारत' या मोहिमेअंतर्गत, 2025 पर्यंत टीबी नष्ट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या मोहिमेद्वारे, क्षयरोगाशी संबंधित जागरूकता निर्माण करणे आणि रुग्णांना चांगले उपचार, केली जात आहेत.
'टीबी मुक्त भारत' या अभियानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या पुढाकाराने मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील एमसीए क्रिकेट मैदानवर विशेष क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते.
हा क्रिकेट सामना नेते विरुद्ध अभिनेते यांच्यात रंगला होता. या सामन्यासाठी अनेक 'नेते' आणि 'अभिनेते' उपस्थित होते.
अभिनेता सुनील शेट्टी, जॅकी श्राॅफ, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार युसूफ पठाण, धैर्यशील माने, मनोज तिवारी तसेच नेते आणि अभिनेत्यांच्या टीममधील अनेक सदस्य उपस्थित होते.
टीम लीडर 11 चे नेतृत्व भाजप खासदार अनुराग सिंग ठाकूर यांनी केले, तर टीम अॅक्टर 11 चे नेतृत्व सुनील शेट्टी यांनी केले.
अनुराग ठाकूर यांच्या टीममध्ये श्रीकांत शिंदे, मनोज तिवारी, चंद्रशेखर, दीपेंद्र हुड्डा यांच्यासह अनेक नेते होते. तर, अभिनेता टिममध्ये सुनील शेट्टी , सोहेल खान, शरद केळकर, रोहित रॉय असे अनेक मोठे कलाकार होते.
सामन्याचे विजेत्या ठरलेल्या अभिनेत्यांच्या टीमला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी ट्राॅफी देऊन गौरविण्यात आले.
'टीबी हारेगा, इंडिया जितेगा' अशा घोषणा देत टीबीला हरवण्याचा संकल्प करून या सामन्याचा आणि कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.
अभिनेता सलमान खान यांनी या क्रिकेट सामन्यावेळी खास उपस्थिती लावली होती.