Rashmi Mane
अपाला मिश्रा या भारतीय परराष्ट्र सेवेतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.
सध्या त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत ते त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगमुळे.
अपाला आणि आयएफएस अधिकारी अभिषेक बकोलिया यांनी उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट पार्कमध्ये निसर्गाच्या कुशीत असलेल्या रिसोर्ट लग्नगाठ बांधली.
आता तिचे हळदी-मेहंदीपासून ते लग्नाच्या कार्यक्रमांपर्यंतचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अभिषेक बकोलिया हा पंजाबमधील फरीदकोट जिल्ह्यातील कोटकपुरा येथील आहे आणि त्याने चंदीगड येथील पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक शास्त्रात पदवी घेतली आहे.
यूपीएससीची तयारी करण्यापूर्वी त्यांनी जेपी मॉर्गन येथे इंटर्नशिप केली. त्याने मार्च २०२० मध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली.
एका वर्षात पहिल्याच प्रयत्नात तो उत्तीर्ण झाला आणि आयएफएस अधिकारी बनला.
कोविड काळामुळे, तो कोणत्याही कोचिंग क्लासेस सामील झाला नाही आणि स्व-अभ्यासाच्या जोरावर, त्याने देशातील सर्वात कठीण मानली जाणारी ही परीक्षा २१८ व्या क्रमांकासह उत्तीर्ण केली.