सरकारनामा ब्यूरो
2024 मध्ये हिंदी, मराठी असे राजकीय चित्रपट प्रदर्शित झाले. ज्यांची खूपच चर्चा सगळीकडे झाली. कोणते आहेत ते चित्रपट जाणून घेऊयात...
धीरज साधरा यांची निर्मिती असलेला साबरमती हा चित्रपट गुजरातमध्ये झालेल्या गोध्रा घटनेवर आधारित असून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
रवी जाधव दिग्दर्शित 'मैं हूँ अटल' या चित्रपटाने चित्रपटगृहात प्रचंड प्रतिसाद दिला. यामध्ये प्रमुख भूमिकेत पंकज त्रिपाठी आहेत.
'द यूपी फाइल्स' हा चित्रपट UPचे मुख्यमंत्री योगी अदित्यानाथ यांच्यावर आधारित आहे. जो कुलदीप उमरावसिंग ओस्तवाल निर्मित आणि नीरज सहाय यांनी दिग्दर्शित केला.
'लव्ह जिहाद' वर आधारित केरळमधील हजारो हिंदू महिलांचे इस्लाममध्ये धर्मांतर करून त्यांना इस्लामिक स्टेटमध्ये भरती करण्यात आले होते.
'द काश्मिर फाईल' हा चित्रपट विवेक अग्निहोत्री यांनी बनवला असून हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावरील सत्य घटनेवर असल्याचे बोलले जात होते.
एक नंबर हा मराठी चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित झाला त्यावेळी त्याचा संदर्भ मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी जोडण्यात आला होता.
'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता.पण याला प्रेक्षकांचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही.
27 सप्टेंबरला प्रदर्शित झालेला धर्मवीर 2 या चित्रपटाचं लोकांनी भरभरुन कौतुक केलं. या चित्रपटाची स्टोरी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित आहे.