IFS Muskan Jindal : दररोज सहा ते सात तास अभ्यास केला अन् पहिल्याच प्रयत्नात झाल्या UPSC पास

Rashmi Mane

IFS मुस्कान जिंदाल

IFS मुस्कान जिंदाल या हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

IFS Muskan Jindal | Sarkarnama

अभ्यासात हुशार

मुस्कान या लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. 12वी बोर्डाच्या परीक्षेत 96.4 टक्के गुण मिळवून त्या शाळेत पहिल्या आल्या होत्या.

IFS Muskan Jindal | Sarkarnama

B.Comमध्ये पदवी

IFS मुस्कान जिंदाल यांनी 12वी पूर्ण केल्यानंतर SD कॉलेज, चंदीगडमधून B.Com ऑनर्स पदवी प्राप्त केली आहे.

IFS Muskan Jindal | Sarkarnama

ग्रॅज्युएशनपासून परीक्षेची तयारी

यासोबतच त्यांनी प्रशासकिय सेवेच्या परीक्षेचीही तयारी बी कॉमला असल्यापासून सुरु केली. पदवीच्या शेवटच्या वर्षात कॉलेजच्या अभ्यासातून वेळ काढून त्यांनी चार ते पाच तास यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

IFS Muskan Jindal | Sarkarnama

रोज 6 ते 7 तास अभ्यास

मुस्कान जिंदाल यांना लहानपणापासूनच सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्याची इच्छा होती. UPSC परीक्षेची तयारी करण्यासाठी त्या रोज 6 ते 7 तास अभ्यास करायच्या.

IFS Muskan Jindal | Sarkarnama

अवघ्या 22 व्या वर्षी UPSC उत्तीर्ण

प्रचंड मेहनतीच्या जोरावर मुस्कान यांनी वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.

IFS Muskan Jindal | Sarkarnama

87 वा क्रमांक

UPSC 2019च्या परीक्षेत त्यांनी 87 वा क्रमांक मिळवत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

IFS Muskan Jindal | Sarkarnama

ध्येय निश्चिती

मुस्कान जिंदल म्हणतात 'परीक्षेची तयारी करताना स्वतःचा समतोल राखणेही खूप महत्त्वाचे आहे. हे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित होण्यापासून रोखू शकते.'

IFS Muskan Jindal | Sarkarnama

Next : चेहऱ्यावर मास्क आणि हातात गदा म्हणाले 'जय बजरंगबली' राहुल गांधींचा नवा अवतार

येथे क्लिक करा