Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील यांची 5 वर्षांत दुप्पट संपत्ती..!

Rashmi Mane

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Imtiaz Jaleel | Sarkarnama

या अर्जाबरोबर मालमत्तेचे शपथपत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहे. यामध्ये उमेदवार तसेच त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची माहिती नमूद करण्यात आली आहे.

Imtiaz Jaleel | Sarkarnama

इम्तियाज जलील जंगम आणि स्थावर मालमत्तेची किंमत 4.15 कोटी रुपये आहे.

Imtiaz Jaleel | Sarkarnama

इम्तियाज जलील यांनी 2019 च्या निवडणुकीत 2.35 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.

Imtiaz Jaleel | Sarkarnama

इम्तियाज जलील यांच्याकडे 3.24 कोटी रुपयांची मालमत्ता (जंगम आणि अचल) आहे, तर त्यांच्या पत्नीकडे 91.09 लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे 75 हजार रुपये आणि पत्नीकडे 25 हजार रुपये रोख असल्याचेही त्यांनी सांगितले.

Imtiaz Jaleel | Sarkarnama

इम्तियाज जलील यांच्याकडे 1.04 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

Imtiaz Jaleel | Sarkarnama

इम्तियाज जलील यांच्याकडे 2.20 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असून, त्यांच्या पत्नीकडे 65 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

Imtiaz Jaleel | Sarkarnama

इम्तियाज जलील यांनी 24.74 लाखांचे कर्जही घेतले आहे. यामध्ये कार कर्ज आणि गृह कर्ज इत्यादींचा समावेश आहे. जलील यांच्याकडे दोन चारचाकी आणि दोन दुचाकी आहेत.

R

Imtiaz Jaleel | Sarkarnama

Next : पाच कोटींचा बंगला, 41 तोळे सोनं; मुरलीधर मोहोळ यांची संपत्ती किती?