Murlidhar Mohol Net Worth : पाच कोटींचा बंगला, 41 तोळे सोनं; मुरलीधर मोहोळ यांची संपत्ती किती?

Akshay Sabale

24 कोटी संपत्ती -

पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची एकूण संपत्ती 24 कोटी 32 लाख 44 हजार 483 रुपये असल्याचे समोर आले आहे.

Murlidhar Mohol | sarkarnama

कला शाखेची पदवी -

मोहोळ यांच्यावर 14 कोटी 85 लाख रुपयांचे कर्ज आहे. मोहोळ यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून कला शाखेची पदवी प्राप्त केली आहे.

Murlidhar Mohol | sarkarnama

जंगम मालमत्ता -

स्वतः मोहोळ, त्यांची पत्नी आणि दोन मुली यांच्या नावाने एकूण 5 कोटी 26 लाख 76 हजार 788 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

Murlidhar Mohol | sarkarnama

ठेवी -

मोहोळ यांच्याकडे 9 हजार 192 रुपयांची, तर पत्नीकडे 1 लाख 21 हजार 124 रुपयांची रोकड आहे. मोहोळ यांच्या नावाने बँकेत 66 लाख 74 हजार 207 रुपयांच्या ठेवी आहेत.

Murlidhar Mohol | sarkarnama

मुलींच्या नावे ठेवी -

पत्नीच्या नावाने 2 लाख 71 हजार 273, तर दोन मुलींच्या नावाने प्रत्येकी अनुक्रमे 49 हजार 981, 10 हजार 689 रुपयांच्या ठेवी आहेत.

Murlidhar Mohol | sarkarnama

स्थावर मालमत्ता -

मोहोळ यांची एकूण स्थावर मालमत्ता 19 कोटी 5 लाख 67 हजार 695 इतकी आहे.

Murlidhar Mohol | sarkarnama

जमीन -

मुळशी तालुक्यातील मुठा गावात 36 गुंठे, कासार आंबोली येथे 27 गुंठे, भूगाव येथे 14 गुंठे जमीन आहे, तर वाई तालुक्यातील येरुली गावात 3.18 एकर जमीन आहे.

Murlidhar Mohol | sarkarnama

बंगला -

पुणे शहरात कोथरूड येथे 5 हजार 245 चौरस फुटांचा बंगला असून, त्याची किंमत 5 कोटी 47 लाख 81 हजार 114 रुपये इतकी आहे.

Murlidhar Mohol | sarkarnama

सोनं अन् वाहन -

मोहोळ यांच्या कुटुंबाकडे 41 तोळे सोन्याचे दागिने आहेत. 22 लाख 14 हजार 382 रुपयांचे एक वाहन आहे.

R

Murlidhar Mohol | sarkarnama

NEXT : साडेअकरा लाखांची अंगठी, तीन आलिशान मोटारी अन् अर्धा किलो सोनं; बारणेंची संपत्ती किती?

Shrirang Barne | Sarkarnama