Pradeep Pendhare
धर्म म्हणजे पूजा नाही. सत्य, करुणा, शुचिता आणि तपस्यातून धर्माची मूल्ये पुढे आली आहेत. ‘हे खा’, ‘ते खा’ किंवा ‘ते खाऊ नका’, हे सांगणे म्हणजे धर्म नाही.
जगण्याच्या सुरक्षिततेसाठी नव्हे, तर ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा शाश्वत धर्म जगाला देण्यासाठी भारत राष्ट्राची निर्मिती झाली.
सत्ययुगापासून स्वातंत्र्य लढ्यापर्यंत धर्म हीच शाश्वत प्रेरणा असून, यालाच 'हिंदू प्रेरणा' असल्याचे मोहन भागवत यांनी म्हटलं.
हिंदू म्हणजे मुस्लिम विरोध नाही, तर सर्व समाजाचे रूप दर्शविणारे विशेषण आहे. सर्व विविधतांना स्वीकारणारे तो उदात्त भाव आहे.
हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा असून त्यावर हजारो वाटांनी अतिक्रमण होत आहे. हे अतिक्रमण आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा विविध बाबींचं असल्यानं ते देशासाठी घातक आहे.
भारत देश मोठा झाला, तर राजकीय दुकान बंद होईल, ही भीती या अतिक्रमणामागे आहे.
इस्लामी आक्रमणावर छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा उपाय लागू पडला. त्याचीच प्रेरणा घेऊन अनेकांनी संघर्ष केला.
इंग्रजांविरुद्धच्या लढ्यातही शिवाजी महाराज हीच प्रेरणा असल्याचं मोहन भागवत यांचे मत आहे.