Rashmi Mane
कंगना रनौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या वादानंतर आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
कंगनाने मुंबईतील पाली हिल येथे असलेला तिचा बंगला विकल्याचे सांगितले जात आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौतने मुंबईतील वांद्रे येथील पाली हिल भागातील नर्गिस दत्त रोडवर असलेला तिचा बंगला 32 कोटी रुपयांना विकला आहे.
जो की कंगनाने सप्टेंबर 2017 मध्ये 20 कोटी रुपयांना खरेदी केला होता.
लोकसभा निवडणुकीत कंगना रनौतने 2024 मध्ये 91 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती जाहीर केली होती,
ज्यामध्ये 28.7 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 62.9 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता समाविष्ट होती.
मुंबईतील हाच चो बंगला आहे ज्या बंगल्यावर 2020 मध्ये बीएमसीच्या कारवाई केली होती.
बेकायदेशीर बांधकाम असल्याचे सांगत कंगनाच्या वांद्रे येथील या इमारतीचा काही भाग पाडण्यात आले होते.
बीएमसी विरोधात कंगनाने केस दाखल केली होती आणि बीएमसीकडून नुकसानभरपाई म्हणून 2 कोटी रुपयांची मागणीही केली, परंतु मे 2023 मध्ये तिने आपली मागणी मागे घेतली.