Vijaykumar Dudhale
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या गैरराजकीय आणि पक्षविरहित संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार सतराव्या लोकसभेत 44 टक्के खासदारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
सर्वाधिक गुन्हेगार खासदार हे उत्तर प्रदेशमधून आले होते. एकूण 80 खासदारांपैकी 41 खासदारांवर किरकोळ आणि गंभीर गुन्हे दाखल होते. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. महाराष्ट्रातील 25 खासदारांवर गुन्हे दाखल आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या 118 खासदारांवर गुन्हे दाखल आहेत, त्यातील 87 खासदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
काँग्रेसच्या 14 खासदारांवर गंभीर गुन्हे
काँग्रेस पक्षाच्या 26 खासदारांवर विविध गुन्हे दाखल असून, त्यातील 14 खासदारांवर गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.
एम. के. स्टॅलिन प्रमुख असलेल्या तमिळनाडूमधील द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे 11 खासदार हे गुन्हे दाखल असलेले आहेत. त्यात सात खासदार हे गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेले आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममती बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या 8 खासदारांवर गुन्हे दाखल आहेत, त्यात 4 खासदार हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेले आहेत.
नितीश कुमार प्रमुख असलेल्या जनता दल युनायटेड पक्षाचे 12 खासदार हे गुन्हे दाखल असलेले आहेत. त्यांच्या 08 खासदारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
आंध्र प्रदेशमधील वायएसआर काँग्रेस पक्षाच्या 8 खासदारांवर गुन्हे दाखल होते, त्यातील 7 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे होते.
R