Jagdish Patil
1854 - भारतातील पहिल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची पुणे येथे स्थापना. हे अशा प्रकारचे भारतातील पहिले महाविद्यालय आहे. शतकभर प्रचलित असलेले "कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पूना' (सी.ओ.इ.पी.) हे नाव महाविद्यालयाने 1911 मध्ये धारण केले. राष्ट्राच्या औद्योगिक, सामाजिक व आर्थिक जडणघडणीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भरीव योगदान देणारे अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वे महाविद्यालयाने घडविली.
1928 - मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरु झाली
1971 - भारत-पाक युद्धात ढाका शहराचा पाडाव होऊन पाकिस्तानी सैन्याचे सेनापती लेफ्टनंट जनरल ए.ए.के.नियाझी यांनी भारतासमोर शरणागती पत्करली. बांगलादेश पूर्णपणे मुक्त झाला. इंदिरा गांधींनी युद्धसमाप्तीची घोषणा केली.
1980 - राष्ट्रीय सुरक्षा विधेयक लोकसभेत मंजूर.
1985 - कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील प्रायोगित फस्ट ब्रीडर रिएॅक्टर राष्ट्राला समर्पित.
1993 - उत्तर प्रदेश विधानसभेत संसदीय लोकशाहीला काळिमा फासणारी घटना. सत्तारूढ समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष युती आणि विरोधी भाजपच्या सदस्यांमध्ये हाणामारी.
2003 - टाटा उद्योगसमूहातील ताजमहाल या मुंबईतील पंचतारांकित हॉटेलच्या स्थापनेस 100 वर्षे पूर्ण. या हॉटेलच्या उभारणीचे स्वप्न जमशेदजी टाटा यांनी पाहिले होते.