Jagdish Patil
कणकवली विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार नितेश रांणेंचा पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.
पर्वती विधानसभेच्या माधुरी मिसाळ यांचीही पहिल्यांदाच मंत्रिपदी वर्णी लागली आहे.
तर सातारचे शिवेंद्रराजे भोसले यांचाही मंत्रिमंडळात समावेश आहे.
जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या मेघना बोर्डीकर यांनाही मंत्रिपद मिळालं आहे.
वर्धा विधानसभेचे आमदार पंकज भोयर हे आता मंत्री झाले आहेत.
खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आकाश फुंडकरांना देखील मंत्रीपद मिळालं आहे.
राळेगाव विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी झालेले अशोक उईके यांचीही मंत्रिपदी वर्णी लागली आहे.
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.