Rashmi Mane
उपमुख्यमंत्री अजित पवार आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जत येथील शिबिरात बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट चार जागा लढेल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
सातारा, शिरूर, रायगड आणि बारामती या लोकसभेच्या जागा लढवणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि शरद पवार गट अशा दोन गटांत विभागला आहे.
त्यामुळे आगामी निवडणुकीत दोन्ही गटांकडून उमेदवार दिले जाणार असल्याने, पवार विरुद्ध पवार असा सामना होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून सध्या बारामतीतून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, साताऱ्यातून श्रीनिवास पाटील आणि शिरूरमधून अमोल कोल्हे खासदार आहेत.
आता आगामी काळातील लाेकसभा या सातारा, शिरूर, रायगड आणि बारामती या मतदारसंघांतून निवडणूक लढवणार आहेत.
या वक्तव्यामुळे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कशी लढत होईल हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.