ITR Filing 2025: इन्कम टॅक्स विभागाचा मोठा निर्णय, रिटर्न फाइल करण्यासाठी आता नवी डेडलाईन

Deepak Kulkarni

ITR फाइल करण्याची अंतिम मुदत

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाइल करण्याची अंतिम मुदत कधी आहे? असा प्रश्न नेहमीच सर्वांना पडत असतो.

Income Tax Return filing | Sarkarnama

मुदत वाढवण्यात येणार का

ITR फाइल करण्यासाठीची मुदत वाढवण्यात येणार का अशी विचारणा करदात्यांकडून नेहमी केली जाते. तसेच नवी मुदत काय असेल याबाबतही उत्सुकता असते.

Income Tax Return filing | Sarkarnama

सात इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म प्रसिध्द

आयकर विभागाकडून 2025-26 या आर्थिक वर्षासाठी आयटीआर 1 ते 7 पर्यंत असे सर्वच्या सर्व सात इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म प्रसिध्द केले आहेत.

Income Tax Return filing | Sarkarnama

नवी मुदत

आयकर विभागाने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी किंवा असेसमेंट इयर 2025-26 (AY 2025-26) साठी रिटर्न सादर करण्याची मुदत आता 15 सप्टेंबर 2025 करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Income Tax Return filing | Sarkarnama

तर विलंब शुल्क

करदात्याला काही कारणास्तव 15 सप्टेंबर किंवा त्यापूर्वी रिटर्न फाइल करता आले नाही, तरीही रिटर्न फाइल करता येणार आहे. मात्र, त्यासाठी विलंब शुल्क भरावे लागणार आहे.

Income Tax Return filing | Sarkarnama

मंगळवारी परिपत्रक

इन्कम टॅक्स विभागाकडून मंगळवारी(ता.27) परिपत्रकाद्वारे टॅक्स रिटर्न सादर करण्याची नवी मुदत जाहीर करण्यात आली आहे.

Income Tax Return filing | Sarkarnama

अनेक महत्त्वपूर्ण बदल

यंदा नव्या ITR फॉर्ममध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

Income Tax Return filing | Sarkarnama

करदात्यांसाठी मोठा दिलासा

नव्या माहितीनुसार, विलंब शुल्कासह 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत रिटर्न फाइल सादर करता येणार आहे. करदात्यांसाठी मोठा दिलासा असणार आहे.

Income Tax Return filing | Sarkarnama

NEXT : पद्मश्री मिळवूनही पाय जमिनीवर ! जळगावमध्ये दिसला खरा हिरो

Chaitram Pawar | Sarkarnama
येथे क्लिक करा...