Aslam Shanedivan
आयकर विभागाने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी आयटीआर भरण्याची शेवटची तारीख जाहिर केली आहे.
2024-25 या आर्थिक वर्षासाठी आयटीआर भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान आयकर विभागाच्या वेबसाइटनुसार, 25 ऑगस्टपर्यंत फक्त 3.68 कोटी रिटर्न दाखल झाले आहेत. जे गेल्या वर्षीच्या निम्मे आहे.
आता 15 सप्टेंबरला फक्त आठ दिवस शिल्लक असून अद्याप रिटर्न भरला नसेल किंवा तो उशिरा ITR भरल्यास दंड आणि व्याज आकराला जाऊ शकतो.
तज्ज्ञांचे मते आयकर रिटर्न भरण्यासाठी शेवटच्या दिवसात घाई केली जाते. यामुळे सर्व्हर डाउनसारख्या समस्यांना करदात्यांना तोंड द्यावे लागते.
यंदा सरकारकडून कर भरण्याची अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली होती. यापूर्वी शेवटची तारीख 31 जुलै होती, जी आता 15 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
तर ज्या करदात्यांना ऑडिट करायचे आहे त्यांच्यासाठी अंतिम मुदत 31 ऑक्टोबर होती.
कर स्लॅबमध्येही बदल करण्यात आला असून नवीन कर प्रणालीप्रमाणे 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही.