सरकारनामा ब्यूरो
ऐतिहासिक लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी ध्वजारोहण केले. यावेळी स्वदेशी बनावटीची 105 एमएम लाईट फिल्डची 21 तोफांची सलामी दिली
आम्ही दीड हजारपेक्षा अधिक कायदे रद्द केले आहेत. कायद्याच्या कचाट्यात लोक अडकू नयेत म्हणून आम्ही हा निर्णय घेतला.
आता आम्ही न्यायसंहिता आणली आहे. आता दंड नव्हे तर न्यायाच्या भावनेला तयार केलं आहे.
तुम्हाला येणाऱ्या छोट्या-छोट्या अडचणींबाबत सरकारला पत्र लिहा, असे आवाहन मोदींनी युवक, प्राध्यापकांना केले.
मोदींनी बँकिंग क्षेत्राचे कौतुक केले. जगभरात आपल्या बँकांचे कौतुक होत असल्याचे ते म्हणाले.
संरक्षण उपकरणे निर्मितीमध्ये आज आपली वेगळी ओळख आहे. भारत संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहे.
जी २० सारखे मोठे इव्हेंट आपण यशस्वी केले. त्यामुळे २०३६ मध्ये होत असलेले ऑलिम्पिकचे यजमानपद आपल्याला मिळावे, हे माझं स्वप्न आहे.
आपण बुद्धांच्या देशात आहोत, युद्धाच्या नाही. भारताच्या प्रगतीची चिंता करू त्यांनी नये.
NEXT: गोविंद मोहन यांची केंद्रीय गृहसचिव पदावर नियुक्ती!