Rajanand More
दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री आहेत. तसेच परिवहन, विधी, माहिती तंत्रज्ञान व पर्यावरण खातेही त्यांच्याकडे आहे.
गहलोत हे केजरीवालांचे विश्वासू सहकारी मानले जातात. त्यामुळे त्यांच्याकडे महत्वाच्या गृहखात्याचा कारभार सोपवण्यात आला.
आम आदमी पक्षामधील काही वरिष्ठ नेत्यांमध्ये गहलोत यांना स्थान आहे. असे असले तरी ते मीडियामध्ये फारसे प्रकाशझोतात नसतात.
नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी गहलोत यांना ध्वजारोहण करण्याचा मान दिला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल तुरुंगात असल्याने प्रश्न निर्माण झाला होता.
गहलोत हे वकील असून त्यांनी दिल्ली विद्यापीठातून विधी शाखेची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. दिल्ली हायकोर्टासह सुप्रीम कोर्टातही वकिली केली आहे.
फेब्रुवारी 2015 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. नजफगड हा त्यांचा मतदारसंघ असून मुख्य शहराबाहेरील ते एकमेव मंत्री आहेत.
गहलोत यांचा केजरीवाल सरकारमध्ये पहिल्यांदाच फेब्रुवारी 2017 मध्ये समावेश करण्यात आला. तेव्हापासून विविध खात्यांची जबाबदारी सांभाळत आहेत.
दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने त्यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. याआधीही टॅक्स प्रकरणात त्यांची संबंधित विभागाने चौकशी केली होती.
गहलोत हे नेहमीच प्रसिध्दीपासून किंवा मीडियापासून दूर राहिले. त्यामुळे ते फारसे प्रकाशझोतात नसतात.