Rajanand More
महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी 31 जुलैला राजस्थानच्या राज्यपालपदाची शपथ घेतली.
राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतरचा पहिलाच स्वातंत्र्यदिन त्यांनी राजभवनात उत्साहात साजरा केला.
राज्यस्थानचे राज्यपाल म्हणून बागडे यांना राज्य पोलिसांनी सलामी दिली. राज
स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपाल बागडे यांनी राजभवनातील औषधी उद्यानात वृक्षारोपण केले.
राजभवनात युध्द स्मारकाच्या रुपाने टी-55 या रणगाड्याचे लोकार्पण राज्यपाल बागडे यांच्या हस्ते करण्यात आले.
भारतीय लष्कराच्या शौर्याचे हा रणगाडा प्रतिक असल्याची भावना राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
राजभवन परिसरातील राजकीय विद्यालयातील गुणवंत विद्यार्थीनींना पुस्तके व मिठाई देऊन त्यांचा सन्मान केला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांनी शुभेच्छा देताना राज्यपाल बागडे यांनी देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत भाजपच्या नेत्या व माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली.