सरकारनामा ब्यूरो
भारताचे माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांचा जन्म करीमनगर येथे तेव्हाचे आंध्र प्रदेश अन् आताच्या तेलंगणा राज्यात झाला.
नरसिंह यांनी ओस्मानिया, मुंबई आणि नागपूर विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले.
शेतकरी आणि वकिली क्षेत्राव्यातिरिक्त त्यांनी राजकारणातही आपली भूमिका बजावली.
आंध्र प्रदेश सरकारमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची जसे की, आरोग्य, शिक्षण आणि कायदा असे अनेक पदभार स्वीकारले.
न्यूयॉर्कच्या G-77 बैठकीचे अध्यक्षपदी त्यांनी भूषवले आहे.
परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांनी अनेक देशांत दौरे केले आहेत.
परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून नरसिंह राव यांनी अमेरिका, पाकिस्तान, बांग्लादेश, इराण, व्हिएतनाम, टांझानिया, गयाना आदींच्या संयुक्त आयोगांचे अध्यक्षपद भूषवले.
भारतीय तत्त्वज्ञान, विविध भाषा शिकणे, कविता करणे यांसारख्या साहित्यात त्यांना विशेष रुची होती
संगीत, चित्रपट आणि नाटक यांसारख्या विविध क्षेत्रांची त्यांना आवड होती.