Rashmi Mane
दरवर्षी भारतात Minority Rights Day 18 डिसेंबरला साजरा केला जातो. या दिवसामागचा उद्देश देशातील अल्पसंख्यांक समुदायांचे हक्क, सुरक्षितता आणि समानतेबाबत जनजागृती करणे हा आहे.
भारताला हिंदू बहुल देश म्हटलं जातं. देशात सुमारे 100 कोटींहून अधिक हिंदू आहेत. मात्र हीच गोष्ट राज्यात थोडं वेगळं आहे.
देशातील काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश असे आहेत, जिथे हिंदू समाजाची लोकसंख्या 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे. तिथे इतर धर्मीय समुदाय बहुसंख्य आहेत.
2011 च्या जनगणनेनुसार भारतात 8 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेश असे आहेत, जिथे हिंदू अल्पसंख्यक आहेत.
लद्दाखमध्ये हिंदू लोकसंख्या फक्त सुमारे 1% आहे. मिजोरम आणि लक्षद्वीपमध्ये सुमारे 2.8%, तर जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास 4% हिंदू आहेत.
नागालँडमध्ये 8.7%, मेघालयमध्ये 11.5%, अरुणाचल प्रदेशात 29% हिंदू लोकसंख्या आहे. मणिपुरमध्येही हिंदू समाज अल्पसंख्यक (41.3%) आहे.
पंजाबमध्ये हिंदू समाजाची लोकसंख्या सुमारे 38.5% आहे. येथे शीख समुदाय बहुसंख्य आहे.
केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात स्पष्ट केलं आहे की, राज्यांना हवं असल्यास ते त्यांच्या राज्यात अल्पसंख्यक दर्जा देऊ शकतात. महाराष्ट्राने 2016 मध्ये यहुदी समाजाला अल्पसंख्यक दर्जा दिला होता.
सध्या भारतात मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन आणि पारसी समुदायांना राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यक दर्जा आहे.