सरकारनामा ब्यूरो
प्रत्येक देशात वक्फ बोर्ड वेगवेगळे असते. भारतात वक्फ बोर्डची एकूण 9.4 लाख एकर जमीन आहे. तर पाकिस्तानात एकूण किती संपत्ती आहे? वाचा...
पाकिस्तानातील वक्फ बोर्डाला "औकाफ विभाग" म्हणून ओळखले जाते.
पाकिस्तानमध्ये 1960ला वक्फ बोर्ड संपत्तीच्या व्यवस्थापनेला सुरुवात करून, 1976 मध्ये "औकाफ विभाग" नियम लागू करण्यात आला. या नियमानुसार सरकारने ही संपत्ती आपल्या ताब्यात घेत यांची जबाबदारी 'औकाफ' विभागकडे दिली.
पाकिस्तानातील वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन "इव्हॅक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ETPB)" आणि प्रांतीय औकाफ विभागांद्वारे केले जाते. यात सिंध, पंजाब, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा येथे स्वतंत्र वक्फ बोर्ड आहेत.
एका न्यूज चॅनेलच्या सर्वेक्षनानुसार, ETPB च्या अधीन एकूण 1 लाख 9 हजार 369 इतकी जमीन, तर पंजाबच्या अधीन 85 हजार 331एकर, सिंधकडे 21 हजार 735, खैबर पख्तूनख्वा 2 हजार 301 आणि बलुचिस्तानच्या अधीन एकूण 2 एकर जमीन आहे.
ETPB कडे एकूण संपत्ती 15 हजार 619 व्यवसायिक संपत्ती असून पंजाबकडे 46 हजार 597, सिंधकडे 12 हजार 362 आणि बलुचिस्तानकडे 668 दुकाने, घरे, व्यावसायिक इमारती, शेतीच्या जमिनीचे छोटे भाग, गोदामे आणि कार्यालये आहेत.
2024 ला सिंध औकाफ विभागाकडे 10 हजार 823 एकर शेत जमीन, 2 हजार 226 दुकाने, 810 फ्लॅट्स इतकी संपत्ती होती. यातून सरकारला 103 दशलक्ष रुपयाचा महसूल मिळाला आहे.