सरकारनामा ब्यूरो
राज्यसभेत भाषण करत असताना गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत एक विधान केले होते. या विरोधात INDIA आघाडीचे खासदार आक्रमक झाले आहेत.
अमित शाह यांच्याविरोधात आज संसदेतल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नेत्यांनी जोरदार आंदोलन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे फोटो हातात घेत काँग्रेस नेत्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला.
यावेळी नेत्यांनी शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
निळ्या रंगाचा ड्रेसमुळे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले गेले.
यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे,शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि इतर नेते सहभागी होते.
सत्ताधारी आणि विरोधक नेेते आमनेसामने आल्यानंतर जोरदार धक्काबुक्की झाली . यामध्ये भाजपचे खासदार मुकेश राजपूत यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तर भाजपच्या महिला खासदार फांगनोन राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. आंदोलनादरम्यान राहुल गांधी माझ्या अत्यंत जवळ येऊन उभे राहिले. त्यामुळे मी अनकम्फर्टेबल झाले होते. ते माझ्यावर ओरडलेही. यामुळे त्याच्याविरोधात मी तक्रार दाखल केली आहे, असे फांगनोन यांनी सांगितले.