सरकारनामा ब्यूरो
विधान परिषदेच्या सभापती म्हणून भाजपचे आमदार राम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
सभागृहात एकमताने राम शिंदे यांची निवड करण्यात आली. यापूर्वी प्रा. ना. स. फरांदे यांनी हे पद भुषवले आहे. फरांदे यांच्यानंतर सभापतीपद भूषवणारे शिंदे हे दुसरे प्राध्यापक ठरले आहेत.
प्रा. राम शिंदे यांचा जन्म १ जानेवारी १९६९ रोजी चौंडी येथील गरीब शेतकरी कुटुंबात झाला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रा. शिंदे यांची जडणघडण झाली. परिस्थितीवर मात करत शिंदे यांनी एम. एस्सी. बीएड शिक्षण पूर्ण केले.
शिंदे यांनी आष्टी येथील धोंडे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी केली.
1995 साली राज्यात भाजप-शिवसेना युती सरकार आले आणि त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली.
तत्कालीन ग्रामविकासमंत्री अण्णा डांगे यांनी अहिल्यादेवींचे जन्मगाव चौंडी विकास प्रकल्पाचा ध्यास घेत या प्रकल्पाची जबाबदारी साहजिकच त्यावेळी उच्चशिक्षित असलेल्या प्रा. राम शिंदे यांच्यावर सोपवली.
2014 ला त्यांची नेमणूक महाराष्ट्राच्या राज्यमंत्रीपदी करत, त्याच्यावर सार्वजनिक आरोग्य, कृषी, फलोत्पादन, विपणन आणि पर्यटन या खात्यांची जबाबदारी दिली.