Rashmi Mane
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची चौथी बैठक काल पार पडली. 28 पक्षांचे नेते एकत्र येत ही बैठक पार पडली.
पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतर आता पुन्हा विरोधीपक्ष एकत्र येत आहेत.
काल दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक पार पडली, लालू प्रसाद यादव, जेडीयू नेते नितीश कुमार, टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे या बैठकीला उपस्थित होते.
तसेच डीएमके प्रमुख एमके स्टॅलिन, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री भगवंत मान, सीताराम येचुरी, टीएमसी अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी हजेरी लावली.
दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये विरोधी पक्षांच्या इंडिया अलायन्सची बैठक पार पडली.
विरोधी पक्षांमधील जागावाटप, संयुक्त प्रचाराची योजना आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी मुकाबला करण्यासाठी रणनीती तयार करणे या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.