Rashmi Mane
रूपा मोदगिल यांना आपल्या करिअरमध्ये अनेक महत्त्वाच्या केसेसमध्ये त्यांनी काम केले आहे.
रूपा मोदगिल या 2000च्या बॅचच्या अधिकारी असून त्या कर्नाटक पोलिस विभागात कार्यरत आहेत.
डी रूपा यांचा जन्म कर्नाटकातील दावणगेरे येथे झाला.
डी रूपा यांनी कर्नाटकातील कुवेम्पू विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी बेंगळुरू विद्यापीठातून मानसशास्त्रात 'एमएससी' देखील केले आहे.
डी रूपा यांनी 2000च्या बॅचमध्ये 43 वा रँक मिळवत 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. 'आयपीएस' झाल्यापासून जवळजवळ 40 वेळा त्यांची बदली झालीये.
'यूपीएससी' उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय पोलिस अकादमीमधून प्रशिक्षण घेतले आहे.
रूपा यांचा कर्नाटक केडरमध्ये समावेश करण्यात आला. त्यांची पहिली पोस्टिंग कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात 'एसपी' म्हणून झाली होती.
रूपा यांनी २००७ मध्ये मध्य प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री उमा भारती यांना न्यायालयाच्या आदेशानुसार अटक केली होती.