Opposition protest on SIR : राहुल, प्रियंका, डिंपल, अखिलेश यांचा SIR प्रकरणावर जोरदार हल्लाबोल, पाहा फोटो!

Rashmi Mane

गोंधळाचे वातावरण

संसदेत आज दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. 'मत चोरी'च्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा संसद भवनातून निवडणूक आयोगाकडे निघाला होता.

Opposition protest on SIR | Sarkarnama

मतदार यादीची पडताळणी

बिहारमधील निवडणूक आयोगाकडून मतदार यादीची सखोल पडताळणी व्हावे तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर तत्काळ चर्चा घेण्याची मागणी विरोधकांनी केली.

Opposition protest on SIR | Sarkarnama

जोरदार घोषणाबाजी

नोटिस फेटाळल्यानंतर राज्यसभेत विरोधकांचा घोषणाबाजीचा पारा चढला; कामकाज स्थगित करण्यात आले.

Opposition protest on SIR | Sarkarnama

मोर्चा अडवला

आयोगाच्या कार्यालयाजवळ पोलिसांनी बॅरिकेट्स लावून मोर्चा अडवला. अखिलेश यादवसह काही खासदारांनी अडथळे ओलांडले, त्यांना व राहुल गांधी यांसह इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Opposition protest on SIR | Sarkarnama

मोर्चाची सुरुवात

मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, अखिलेश यादव, प्रियंका गांधी, संजय राऊत यांच्यासह अनेक विरोधी खासदार मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

Opposition protest on SIR | Sarkarnama

मोर्चा रोखला

परिवहन भवनाजवळ पोलिसांनी मोठे बॅरिकेड्स उभारून मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगून मोर्चा रोखला. पोलिलांनी मोर्चा अडवत असताना खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप होत आहे.

Opposition protest on SIR | Sarkarnama

अखिलेश यादवांचे आंदोलन

अखिलेश यादव बॅरिकेड्सवर चढून रस्त्यावर बसले. महुआ मोईत्रा यांच्यासह काही खासदारांनी बॅरिकेड्स ओलांडून थेट रस्त्यावर आंदोलन केले.

Opposition protest on SIR | Sarkarnama

पोलिसांनी घेतले ताब्यात

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या खासदारांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले. खासदारांनी ‘SIR’ आणि ‘वोट चोरी’ लिहिलेल्या पांढऱ्या टोपी, पोस्टर्स, बॅनर घेऊन घोषणाबाजी केली. SIR प्रक्रिया मागे घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Opposition protest on SIR | Sarkarnama

Next : लाडक्या बहिणींनो, 1500 रुपये अजूनही आले नाहीत? 'या' कारणांमुळे अडकलेत पैसे

येथे क्लिक करा