Sachin Fulpagare
विरोधी पक्षांमध्ये सर्वात मोठा पक्ष असलेली काँग्रेस 320 ते 330 जागांवर निवडणूक लढवणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेस लढत असलेल्या 330 जागांपैकी 250 अशा जागा अशा आहेत जिथे काँग्रेस स्वबळावर लढू शकते. तर 75 जागा अशा आहेत, जिथे मित्र पक्षांसोबत आघाडी आहे.
काँग्रेसची आघाडी संबंधिची समिती आपला अहवाल पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. हा अहवाल 3 जानेवारीला दिला जाऊ शकतो.
आघाडीशी संबंधित समितीचा अहवाल मिळाल्यानंतर काँग्रेस आघाडीतील घटक पक्षांसोबत चर्चा करणार आहे.
महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये काँग्रेस घटक पक्षांसोबत जागावाटप करेल.
पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीत आघाडी होण्याची शक्यता धूसर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी 18 जागा काँग्रेस, शिवसेना 15 आणि राष्ट्रवादी 15 जागा लढवण्याची शक्यता आहे. यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.