Deepak Kulkarni
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीपूर्वी 14 जानेवारी ते 20 मार्च दरम्यान भारत न्याय यात्रा काढण्याची घोषणा केली आहे.
हा 66 दिवसांचा प्रवास 14 राज्यांतील 85 जिल्ह्यांतून जाणार आहे.
सरकार स्थापन झाल्यास 'न्याय' योजना लागू करण्याचे आश्वासन काँग्रेसने यापूर्वीच दिले आहे.
काँग्रेसने आपल्या 2019 च्या जाहीरनाम्यात ही योजना जाहीर केली होती, परंतु त्याचा परिणाम 52 जागांवर विजयापुरता मर्यादित राहिला.
काँग्रेसने या योजनेच्या घोषणेला उशीर केल्याने ती तळागळापर्यंत पोहोचू शकली नाही, असे मानले जात होते. त्यामुळे काँग्रेसला जनतेच्या पाठिंब्याचा लाभ घेता आला नाही.
आता काँग्रेसकडून पुन्हा 'न्याय' योजनेची चर्चा सुरू केली आहे.
28 डिसेंबर रोजी पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आयोजित मेळाव्यात अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या योजनेची घोषणा केली.
ते म्हणाले ,आम्ही सरकारमध्ये आलो तर न्याय योजना राबवू.त्यामुळे महिलांना वर्षाला किमान 60 ते 70 हजार रुपये मिळणार आहेत.
न्याय योजनेमुळे मोदी सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजना आणि मध्यप्रदेशातील लाडली बहना योजना यांसारख्या योजना बंद होतील, असेही काँग्रेसने म्हटले होते.