Rashmi Mane
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी इंडिया (INDIA) आघाडीनं आपला उमेदवार जाहीर केला आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती व गोव्याचे माजी लोकायुक्त न्यायमूर्ती (निवृत्त) बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे.
आंध्र प्रदेशातील ओबीसी समाजातून आलेले रेड्डी यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण करून वकील म्हणून करिअरची सुरुवात केली
1995 मध्ये ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. त्यानंतर 2007 मध्ये त्यांची सुप्रीम कोर्टात नियुक्ती झाली आणि 2011 पर्यंत त्यांनी तेथे काम केले.
सामाजिक न्याय, मानवाधिकार आणि संवैधानिक मूल्यांवर त्यांनी दिलेले निर्णय चर्चेत राहिले. निवृत्तीनंतर गोव्याचे लोकायुक्त म्हणून भ्रष्टाचारविरोधी पावले उचलून त्यांनी आपली निष्पक्ष प्रतिमा आणखी बळकट केली.
बी. सुदर्शन रेड्डी यांची साधी जीवनशैली, निष्पक्ष प्रतिमा आणि कायद्याबद्दलची निष्ठा ही त्यांची सर्वात मोठी ताकद मानली जाते.