Zojila Tunnel Breakthrough: भारतासाठी सर्वात अभिमानाचा क्षण, 13 किमी लांबीचा 'झोजिला' बोगदा पूर्ण, काय आहेत खास वैशिष्ट्यं?

Deepak Kulkarni

बहुप्रतिक्षित स्फोट यशस्वी

देश अनेक दशकांपासून ज्याची वाट पाहत होता. जगातील सर्वात उंच आणि सर्वात लांब, दुहेरी वाहतुकीसाठीच्या झोजिला बोगद्यामध्ये बहुप्रतिक्षित स्फोट यशस्वी झाला. दोन्ही टोकं उघडण्यात आली आहे.

Zojila Tunnel | Sarkarnama

नव्या सुवर्णाध्यायाची भर

भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या मंगळवारी (ता.9 जून) इतिहासात एका नव्या सुवर्ण अध्यायाची भर पडली.

Zojila Tunnel | Sarkarnama

ऐतिहासिक टप्पा

दोन्ही टोके जोडले गेल्यामुळे झोजिला बोगद्याच्या बांधकामामुळे एक मोठा आणि ऐतिहासिक टप्पा गाठला गेला, जो लडाखला काश्मीर आणि उर्वरित भारताशी वर्षभर सुरक्षित जोडणार आहे.

Zojila Tunnel | Sarkarnama

13 किमी लांबी

भारताच्या पायाभूत सुविधांच्या इतिहासातील 13 किमी लांबीचा झोजिला बोगदा यशस्वीरीत्या पूर्ण होणे ही बाब निर्णायक क्षण ठरला आहे. 

Zojila Tunnel | Sarkarnama

संकटांचा सामना

सुमारे सहा वर्षांचा कालावधी, 11500 फुटांपेक्षा जास्त उंचीवर काम, उणे 30 अंश सेल्सिअस तापमान, हिमस्खलन अशा विविध संकटांचा सामना करावा लागला.

Zojila Tunnel | Sarkarnama

1200 हून अधिक लोकांचं योगदान

झोजिला बोगदा या प्रोजेक्टमध्ये मेघा इंजिनिअरींगच्या 1200 हून अधिक लोकांनी योगदान दिले. सुमारे 80 टक्के लोक हे जम्मू-काश्मीरमधील स्थानिक पातळीवरील होत आहे.

Zojila Tunnel | Sarkarnama

बोगदा खुला

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले आहेत. जानेवारी-फेब्रुवारी 2028 पर्यंत जनतेसाठी हा बोगदा खुला केला जाण्याची शक्यता आहे.

Zojila Tunnel | Sarkarnama

न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड

मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीकडे या बोगद्याचं काम पाहते आहे. तो न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) वापरून बांधण्यात आल्याचं समोर येत आहे, आहे.

Zojila Tunnel | Sarkarnama

अत्याधुनिक वैशिष्ट्ये

या बोगद्याचे सेमी-ट्रान्सव्हर्स व्हेंटिलेशन सिस्टीम, सीसीटीव्ही निगराणी, रेडिओ कम्युनिकेशन, अखंडित वीजपुरवठा आणि स्मार्ट टनेल मॅनेजमेंट सिस्टीम (SCADA) यांसारखी अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत. हा बोगदा उघडल्यामुळे पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा होण्याची शक्यता आहे.

Zojila Tunnel | Sarkarnama

NEXT 'ड्रायव्हिंग लायसन्स' अन् वाहन खरेदी-विक्री प्रोसेसमध्ये लवकरच मोठा बदल, वाहनधारकांचा मनस्ताप वाचणार

Driving-Licence.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...