Driving Licence Rule: 'ड्रायव्हिंग लायसन्स' अन् वाहन खरेदी-विक्री प्रोसेसमध्ये लवकरच मोठा बदल, वाहनधारकांचा मनस्ताप वाचणार

Deepak Kulkarni

दिलासादायक निर्णय

देशभरातील सर्व नव्या वा जुन्या अशा सर्वच प्रकारच्या वाहनधारकांसाठी अतिशय दिलासादायक निर्णय घेण्याच्या विचाराधीन आहे.

Driving Licence | Sarkarnama

मोठा बदल

केंद्र सरकार ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनांशी संबंधित नियमांत लवकरच मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

Driving Licence Validity | Sarkarnama

20 वर्षांकरिता वैध

सध्या ड्रायव्हिंग परवान्याची मर्यादा (लायसन्स) ही 20 वर्ष आहे. यानंतर आपल्या परवान्याचं वाहनधारकांना पुन्‍हा नूतनीकरण (रिनिव्ह) करावं लागतं.

Driving Licence Validity | Sarkarnama

मनस्ताप

आपलं लायसन्स नुतनीकरणाची किचकट प्रक्रिया पूर्ण करताना सर्वसामान्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते.

Driving Licence Validity | Sarkarnama

50 वर्षांपर्यंत मर्यादा

पण आता सरकार ड्रायव्हिंग लायसन्सची मर्यादा ही 20 वरुन थेट 50 वर्षांपर्यंत करणार आहे. याबाबतची माहिती 'टाइम्स ऑफ इंडिया'ने माहिती दिली आहे.

Driving Licence Validity | Sarkarnama

इतर सेवाही ऑनलाईन

केंद्र सरकार हे केवळ ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता वाढवण्यावरच नव्हे, तर वाहनांविषयीची सर्व आवश्यक सेवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या प्रयत्नात आहे.

Driving Licence Validity | Sarkarnama

खरेदी-विक्री प्रक्रिया

यामुळे आगामी काळात सरकारचा निर्णय झालाच तर, वाहन परवान्यासह खरेदी-विक्रीची प्रक्रियाही अत्यंत पारदर्शक व सुटसुटीत होण्याची शक्यता आहे.

Driving Licence Validity | Sarkarnama

ऑनलाईन प्लॅटफॉर्म

सर्वसामान्यांसाठी सध्याच्या घडीला वाहनाची मालकी बदलणे (व्हेईकल ऑनरशिप ट्रान्सफर) आणि परमिट रिनिव्ह करणं यांसारखी अनेक कामं पूर्णपणे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करता येणे शक्य होणार आहे.

Driving Licence Validity | Sarkarnama

'ईज ऑफ लिविंग' धोरण

अर्जदाराला आता आरटीओसंंबंधीच्या कोणत्याही कामासाठी कार्यालयात आवश्यकता भासणार नाही. सरकार 'ईज ऑफ लिविंग' धोरण आता आरटीओ प्रशासकीय यंत्रणेतही मोठ्या प्रमाणात राबवणार आहे.

Driving Licence Validity | Sarkarnama

NEXT: विधानपरिषदेला ईव्हीएम नाही तर मतपत्रिकेवर होणार मतदान, मत बाद होऊ नये म्हणून आयोगाचा इशारा अन् पेन वापरावरही मोठी सूचना

MLC Election | Sarkarnama
येथे क्लिक करा..