India Crude Oil Stock : देशात किती दिवसांचा इंधन साठा? मोदी सरकारने आकडाच सांगितला...

Rajanand More

इराण युध्द

इराण युध्दामुळे देशामध्ये इंधन तुटवडा होण्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवर वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

iran-war-3.jpg | Sarkarnama

तुटवडा नाही

देशात पेट्रोल, डिझेलसह एलपीजी सिलिंडरचा तुटवडा नसल्याचे केंद्र सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात स्थिती सुधारत आहे.

Petrol | Sarkarnama

पुरेसा साठा

सर्व पेट्रोल पंपांवर इंधनाचा मुबलक साठा आहे. नागरिकांकडून गर्दी केली जात असल्याने अचानक विक्रीत आणि मागणीमध्ये वाढ झाली आहे.

Petrol | Sarkarnama

इंधन किती?

देशात पुढील दोन महिने पुरेल एवढा क्रुड इंधन उपलब्ध होणार असल्याचे मोदी सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Crude oil | Sarkarnama

भारत सुरक्षित

पश्चिम आशियामध्ये घडत असलेल्या घडामोडींचा पुढील काही महिने देशावर परिणाम होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Iran | sarkarnama

उत्पादन वाढले

एलपीजीचे देशांतर्गत उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. त्यामुळे देशात एलपीजीचा तुटवडाही नाही, अशी माहिती सरकारने दिली.

LPG | Sarkarnama

५० लाख सिलिंडर

देशभरात दररोज ५० लाख सिलिंडरचे वितरण होत आहे. देशांतर्गत उत्पादन वाढल्याने आयात कमी झाली आहे.

LPG | Sarkarnama

 उपाययोजना

इंधन व एलपीजीचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने उपाययोजना केल्या जात आहेत.

Narendra Modi | sarkarnama

NEXT : EPFO चं मोठं पाऊल, 5200 कोटी थेट खातेदारांच्या बँक खात्यात जमा होणार

येथे क्लिक करा.