Ganesh Sonawane
चनली नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बॅंक करते. देशात चार ठिकाणी चलनी नोटा छापन्याचे प्रेस आहेत.
1947 पर्यंत केवळ नाशिक प्रेसच नोटा छापण्याचे काम करत होती. ज्यामध्ये 10, 100 आणि 1000 च्या नोटा छापल्या जात.
त्यानंतर 1975 मध्ये मध्य प्रदेशातील देवास येथे देशातील दुसरा प्रिंटिंग प्रेस सुरू झाला.
त्यानंतर 1999 साली कर्नाटकच्या म्हैसूर येथे प्रिंटिंग प्रेस सुरू झाली.
त्यानंतर 2000 साली पश्चिम बंगालमधील सालबोनीमध्ये नोटा छापण्यासाठी प्रिंटिंग प्रेस सुरू करण्यात आली.
एकूणच सध्या भारतात नोटा छापण्यासाठी महाराष्ट्रातील नाशिक, मध्य प्रदेशातील देवास, कर्नाटकातील म्हैसूर आणि पश्चिम बंगालमधील सालबोनी या चार ठिकाणी चलनी नोटा छापल्या जातात.
देवास आणि नाशिक येथील प्रेस वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली काम करतात.
तर सालबोनी आणि म्हैसूर येथील प्रेस भारतीय रिझर्व्ह बँकेची उपकंपनी भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडमार्फत चालवली जाते.
जेवढे नोटेचे मुल्य कमी असते तेवढा छापण्याचा खर्च अधिक असतो.
10 रुपयांची नोट छापण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेला किती खर्च येतो?