Jagdish Patil
रुपया हे भारताचे चलन आहे. पण तुम्हाला माहितेय का जगातील इतर देशांमध्येही रुपया चलन म्हणून वापरला जातो.
जगातील इतर कोणकोणत्या देशांमध्ये रुपया चलन म्हणून वापरला जातो? ते जाणून घेऊया.
इतर देशांमध्ये वापरला जाणारा रुपया हा भारतीय रुपया नाही. मात्र, या देशांचे जे स्वतंत्र चलन आहेत, त्याला रुपया म्हटलं जातं.
तर कोणकोणत्या देशांमध्ये रुपया हे चलन वापरलं जातं आणि ते का वापरला जातं? ते देखील जाणून घेऊया.
इंडोनेशियाच्या चलनाला रुपिया म्हणतात. हा आग्नेय आशियातील सर्वात मोठा देश आहे आणि तिथे रुपियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
नेपाळचे चलन रुपया आहे. नेपाळ आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांमुळे दोन्ही देशांचे चलन समान आहेत.
भूतानच्या चलनालाही रुपया म्हणतात. भूतान आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंधांमुळे दोन्ही देशांच्या चलनांची देवाणघेवाण होते.
श्रीलंकेच्या चलनाला श्रीलंकन रुपया म्हणतात. श्रीलंका आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांमुळे दोन्ही देशांच्या चलनांमध्ये साम्य आहे.
मालदीवमध्येही रुपया हेच चलन आहे. मालदीवमध्ये पर्यटन उद्योग खूप विकसित झाला आहे आणि तेथे भारतीय रुपया देखील स्वीकारला जातो.