Pradeep Pendhare
जागतिक वित्तीय सेवा क्षेत्रासाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून भारताचा उदय होत असल्याचे एका अभ्यासातून दिसून आले आहे.
‘ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेस मार्केट्स : टॉप टॅलेंट लोकेशन्स 2026' या अहवालात जगातील वित्तीय बाजारपेठांचा आढावा घेतला आहे.
मुंबईला वित्तीय सेवा क्षेत्रातील मनुष्यबळासाठी ‘ग्लोबल सेंटर’ म्हणून ओळख मिळाली आहे.
दिल्ली एनसीआर ‘स्ट्रॅटेजिक सेंटर’ तर बंगळूर जगातील प्रमुख ‘डोमेस्टिक अँड ऑपरेशनल सेंटर’ म्हणून समोर आले आहे.
‘कोलियर्स’च्या अहवालानुसार, मुंबई, दिल्ली एनसीआर आणि बंगळूर या शहरांनी जगातील पहिल्या 30 वित्तीय सेवा बाजारपेठांमध्ये स्थान मिळवले आहे.
वित्तीय सेवा कंपन्या आता टॅलेंट, खर्च आणि तांत्रिक बदल यांचा समतोल राखत असून, भारतीय शहरे त्यांच्या धोरणात्मक आणि कार्यात्मक गरजांसाठी महत्त्वाची ठरत आहेत.
आशिया-प्रशांत क्षेत्रातही मनुष्यबळाच्या बाबतीत भारत आघाडीवर असून बंगळूर, मुंबई आणि पुणे ही शहरे पहिल्या तीन क्रमांकांवर आहेत.
मुंबई, दिल्ली आणि बंगळूर व्यतिरिक्त हैदराबाद, पुणे आणि चेन्नई या शहरांची ओळख बॅक-ऑफिस आणि विशेष कार्यांसाठी पूरक ठरणारी उदयोन्मुख केंद्रे म्हणून होत आहे.
बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (बीएफएसआय) क्षेत्रातील कंपन्यांच्या विस्तारामुळे या शहरांच्या रिअल इस्टेट मार्केटलाही मोठी चालना मिळत आहे.