Pradeep Pendhare
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस भाडे सवलतीच्या नियमात 1 ऑगस्टपासून बदल होत असून, सवलत घेणाऱ्या प्रवाशांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ अनिवार्य असणार आहे.
या नव्या नियमाची अंमलबजावणी प्रथम महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ या श्रेणीतील प्रवाशांवर होईल.
महामंडळ विद्यार्थी, दिव्यांग, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पुरस्कार विजेते, अशा सुमारे 35 वेगवेगळ्या श्रेणींतील प्रवाशांना भाडे सवलत प्रदान करत आहे.
विविध सवलत योजना सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने राबवणे हा मुख्य उद्देश असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात आतापर्यंत 51 लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी एनसीएमसी कार्डासाठी नोंदणी पूर्ण झाली आहे. यातील सुमारे 25 लाख कार्ड सक्रिय झाली आहेत.
कार्ड काढण्यासाठी परिवहन महामंडळाने चार हजाराहून अधिक अधिकृत एजंट्सची नियुक्ती केली आहे.
विद्यार्थ्यांना ‘सारल’ ओळख क्रमांकाशी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्डशी, तर दिव्यांग व्यक्तींसाठी ‘युनिक डिसॅबिलिटी आयडी’शी ही कार्डसंलग्न असणार आहे.
प्रवासी बस स्थानकांवर 199 रुपये भरून कार्ड मिळणार असून, कार्डची मुदत संपल्यावर नवीन कार्ड 149 रुपये शुल्क आकारले जाईल.