Roshan More
देशातील पहिली हायड्रोजन फ्यूल-सेल ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणाच्या जींद रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवतील.
ही ट्रेन १२00 किलोवॉट क्षमतेच्या अत्याधुनिक हायड्रोजन फ्यूल-सेल प्रोपल्शन सिस्टमवर कार्य करेल.
या आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या रेल्वेचा कमाल वेग ७५ किलोमीटर प्रति तास इतका असेल.
ही रेल्वे विजेच्या ओव्हरहेड लाईन्सवर (OHE) किंवा डिझेल इंजिनवर अजिबात अवलंबून असणार नाही. हायड्रोजन इंधनाचा वापर केल्यामुळे ही ट्रेन पूर्णपणे प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणासाठी फायदेशीर ठरेल.
ही ट्रेन जींद ते सोनीपत दरम्यान धावणार असून दोन्ही स्थानकांतील सुमारे ९० किमीचे अंतर २ तासांत कापेल.
ही रेल्वे दिवसभरात एकूण दोन फेऱ्या मारेल आणि दररोज सुमारे ३५६ किलोमीटरचे अंतर पूर्ण करेल.
या हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या रेल्वेमधून एकाच वेळी एकूण ६८२ प्रवासी प्रवास करू शकतील.