मोदी सरकारचे CM विजय यांना मोठं गिफ्ट; सर्वात अनुभवी IAS अधिकाऱ्यासाठीचा आग्रह केला मान्य...

Rajanand More

मुख्यमंत्री विजय

तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी पद स्वीकारल्यापासून प्रशासनात शिस्त आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी अनेक अनुभवी आयएएस अधिकाऱ्यांना दिमतीला घेतले आहे.

Thalapathy Vijay | Sarkarnama

एम. साई कुमार

तामिळनाडूचे मुख्य सचिव एम. साई कुमार हे ३१ ऑगस्ट रोजी सेवेतून निवृत्ती होणार होते. पण त्यांना मुदतवाढ मिळावी, अशी मागणी विजय यांच्या सरकारने केंद्र सरकारकडे केली होती.

IAS Dr. M. Sai Kumar | Sarkarnama

मुदतवाढ

अखेर केंद्र सरकारने राज्य सरकारची विनंती मान्य केली आहे. साई कुमार यांना १ सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीसाठी म्हणजेच सहा महिन्यांची सेवावाढ देण्यात आली आहे.

IAS Dr. M. Sai Kumar | Sarkarnama

आयोगाकडून नियुक्ती

विधानसभा निवडणुकांच्या काळात केंद्रीय निवडणूक आयोगाने एन. मुरुगानंदम यांच्या जागी एम. साई कुमार यांची तामिळनाडूचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली होती.

IAS Dr. M. Sai Kumar | Sarkarnama

विजय यांच्याकडून बदल्या

टीव्हीके (TVK) सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यंमत्री विजय यांनी अनेक वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र साई कुमार यांच्यावर सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी म्हणून विश्वास कायम ठेवला.

IAS Dr. M. Sai Kumar | Sarkarnama

महत्वाच्या जबाबदाऱ्या

एम. साई कुमार यांनी यापूर्वी विविध विभागांचे प्रमुख म्हणून महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. राज्यातील सर्वात अनुभवी अधिकारी म्हणून पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या विजय यांनी त्यांना आणखी महिन्यांसाठी सोबत ठेवण्याचा निर्णय घेतला.

IAS Dr. M. Sai Kumar | Sarkarnama

मुख्यंमत्र्यांचे प्रधान सचिव

साई कुमार हे २०१८ ते २०२२ या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री एडप्पडी के. पलानीस्वामी यांचे प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते.

IAS Dr. M. Sai Kumar | Sarkarnama

३६ वर्षांची सेवा

१९८७ मध्ये राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त केलेले साई कुमार हे १९९० च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. प्रशासनात त्यांची तब्बल ३६ वर्षांची सेवा आहे.

IAS Dr. M. Sai Kumar | Sarkarnama

NEXT : पोलीस दलाला 10 वर्षांतच रामराम; मुख्यमंत्र्यांशी पंगा घेतल्यानंतर डॅशिंग महिला अधिकारी थेट राजकारणात

येथे क्लिक करा.