Rashmi Mane
रिटायरमेंटपूर्वीच PF काढलात? मग खरंच तुम्हाला पेंशन मिळणार का? चला जाणून घेऊया!
नोकरी करताना तुमच्या पगारातून PF कपात होते. पण हे पैसे फक्त सेव्हिंग नाहीत, तर भविष्यात पेंशन म्हणून उपयोगी होतात.
तुमच्या पगाराचा 12% भाग PF मध्ये जातो आणि कंपनीदेखील एवढाच हिस्सा PF स्वरूपात जमा करते.
कंपनीचे पैसे 2 भागांमध्ये जमा केले जातात. 3.67% पीएफ खात्यात जातात आणि 8.33% ईपीएसमध्ये जातात.
जर तुम्ही 10 वर्षे सतत पीएफ अकाउंटमध्ये पैसे जमा केले तर तुम्हाला 50 वर्षांच्या वयात पेन्शनचा लाभ मिळतो.
नोकरी सोडल्यानंतर बरेच लोक PF आणि EPS चे पूर्ण पैसे एकदम काढून टाकतात.
पैसे एकत्र काढल्याने पेंशनची सोय संपते .त्यामुळे, तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळत नाही.
PF अकाउंटमधला फंड काढला तरी EPS फंड तसाच ठेवावा. EPS फंड जसाच्या तसा ठेवल्यास तुम्ही 50 वर्षांनंतर पेंशन क्लेम करू शकता.