सरकारनामा ब्यूरो
देशात 24 डिसेंबर हा (DMRC) Delhi Metro Rail Corporation स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो.
देशातील पहिली मेट्रो ट्रेन 24 ऑक्टोबर 1984 ला कोलकाता येथून सुरू झाली.
ही मेट्रो ट्रेन सुरुवातीला कोलकाता ते भवानीपूर या स्थानकापर्यंत लोकांच्या सेवेसाठी होती.
भारताची राजधानी दिल्ली येथे दुसऱ्यांदा 24 डिसेंबर 2002 ला मेट्रो सुरू करण्यात आली.
या मेट्रोचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते करण्यात आले होते.
दिल्लीतील ही मेट्रो शाहदरा ते तीस हजारी या दरम्यान सेवेसाठी उपलब्ध होती.
दिल्ली मेट्रोला दिल्ली एनसीआरची 'लाईफलाइन' असं म्हटलं जातं.
दररोज दिल्ली मेट्रोनं तब्बल 50 लाख इतके प्रवासी प्रवास करतात.