सरकारनामा ब्यूरो
सीमा राव या भारतातील पहिल्या आणि एकमेव महिला कमांडो ट्रेनर आहेत.
सीमा राव या जगातील दुर्मिळ लोकांपैकी एक आहे, ज्यांनी मार्शल आर्ट कलेत प्रभुत्व मिळवले आहे.
सीमा या एक आयुर्वेदीक डॉक्टर असून, क्रायसिस मॅनेजमेंटमध्ये एमबीए पदवीधर देखील आहेत.
ऑल राऊंडर सीमा या एक सहलेखिका देखील आहेत. त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले.
भारतातील पहिल्या मिश्र मार्शल आर्ट चित्रपटाची निर्मिती आणि त्यात त्यांनी अभिनय देखील केला आहे.
भारतीय सशस्त्र दल, निमलष्करी आणि पोलीस दलातील तब्बल 20 हजार सैनिकांना कोणतीही भरपाई न देता प्रशिक्षण दिले आहे.
आर्मी स्पेशल फोर्स, एनएसजी ब्लॅक कॅट्स, आयएएफचे गरूड कमांडो फोर्स, नेव्ही मरीन कमांडोज यासह इतर अनेक दलातील कमांडोनाही त्यांनी प्रशिक्षित केले आहे.
आयुष्यातील तब्बल 25 वर्षे या सेवेसाठी बहाल करणाऱ्या त्या देशातील शक्तिशाली महिला आहेत.
वडील रमाकांत सिनारी यांच्याकडून त्यांना या गोष्टीची प्रेरणा मिळाली, जे पोर्तुगीज राजवटीविरुद्ध लढणारे स्वातंत्र्यसैनिक होते.