Rajanand More
भारतीय फुटबॉल संघाचे माजी कॅप्टन. लाखो फुटबॉलप्रेमींचे हिरो म्हणून त्यांची ओळख आजही आहे.
फुटबॉलमधील कामगिरीबद्दल भारत सरकारचा अर्जून पुरस्कार देऊन सन्मान. भारतीय फुटबॉल महासंघाचे सल्लागार म्हणूनही काम.
मुळचे सिक्कीमचे असले तरी पश्चिम बंगालमधून राजकारणात. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश.
पहिली निवडणूक पश्चिम बंगालमधून लढवली. २०१४ मध्ये दार्जिलिंग लोकसभा मतदारसंघात टीएमसीचे उमेदवार. २०१६ मध्ये सिलीगुडी विधानसभेतही उमेदवारी.
दोन्ही निवडणुकीत पराभवानंतर सिक्कीममध्ये स्वत:चा पक्ष काढला. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत गंगटोक मतदारसंघातही पराभव. पोटनिवडणूकही हरले.
मागीलवर्षी हमरो सिक्कीम पार्टी सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटमध्ये विलीन केली. सध्या फ्रंटचे उपाध्यक्ष.बर
2024 च्या विधानसभा निवडणुकीत बरफुंग मतदारसंघात पराभव. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे उमेदवार विजयी.
भुतिया यांच्या पक्षाचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाला. 32 पैकी केवळ एका जागेवर विजय. एसकेएमला 31 जागा मिळाल्या.
भुतिया मागील दहा वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. पण आतापर्यंत लढलेल्या सर्व सहाही निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.