Vijaykumar Dudhale
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे भाजपचे उमेदवार तथा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर असून या ठिकाणी काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या आघाडीवर आहेत.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार या पिछाडीवर असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे आघाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
माढ्यातून भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पिछाडीवर दाखवण्यात आले असून भाजपतून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाऊन निवडणूक लढविणारे धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले हे पिछाडीवर असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत.
सांगलीतून हॅट्ट्रीकच्या मनिषा बाळगून असलेले भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना मागे टाकून वंचित बहुजन आघाडीचे विशाल पाटील हे आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.
सर्वाधिक चर्चेत असलेल्या नगर दक्षिण मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे पिछाडीवर असल्याचा अंदाज असून शरद पवार यांच्या पक्षाचे नीलेश लंके आघाडीवर असल्याचा अंदाज या पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाच्या खासदार पूनम महाजन यांचे तिकिट कापून भाजपच्या तिकिटावर लोकसभेच्या मैदानात उतरलेले ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम पिछाडीवर असून काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड हा आघाडीवर असल्याचा अंदाज हा पोल सांगतो.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार राम सातपुते पिछाडीवर असून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या आघाडीवर असल्याचे या एक्झिट पोलमध्ये नमूद करण्यात आलेले आहे.