Rupee vs Dollar : भारताकडे किती परकीय चलनसाठा? सरकारकडून मोठ्या आर्थिक उपाययोजनांचे संकेत

Pradeep Pendhare

वाढता ताण

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती, वाढते कच्च्या तेलाचे दर आणि जागतिक आर्थिक अस्थिरता यामुळे भारताच्या परकीय चलनसाठ्यावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.

Rupee vs Dollar | Sarkarnama

काटकसरीचं आवाहन

परकीय चलनाचा अनावश्यक वापर कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना काटकसरीचा संदेश दिला आहे.

Rupee vs Dollar | Sarkarnama

रुपयाची घसरण कायम

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपयावर दबाव कायम आहे. गेल्या सलग 13 दिवसांपासून रुपयाची घसरण सुरू असून डॉलरसमोर रुपया 96.93 या पातळीपर्यंत पोहोचला आहे.

Rupee vs Dollar | Sarkarnama

भारताचा परकीय चलनसाठा

भारताकडे सुमारे 690 अब्ज डॉलर इतका परकीय चलनसाठा आहे. भारतीय रुपयांमध्ये हा आकडा तब्बल 66 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे.

Rupee vs Dollar | Sarkarnama

आर्थिक तज्ज्ञांचं मत

1 ट्रिलियन डॉलरच्या तुलनेत भारताचा चलनसाठा अजूनही 310 अब्ज डॉलरने कमी असल्याचे आर्थिक तज्ज्ञ सांगतात.

Rupee vs Dollar | Sarkarnama

डॉलरचा दबदबा

जगातील बहुतांश देश त्यांच्या परकीय चलनसाठ्यात 60 टक्क्यांहून अधिक हिस्सा अमेरिकन डॉलरमध्ये ठेवतात. कारण डॉलर हे जागतिक स्तरावर सर्वाधिक स्वीकारले जाणारे आणि व्यवहारात वापरले जाणारे चलन मानले जाते.

Rupee vs Dollar | Sarkarnama

चीन पहिल्या क्रमांकावर

परकीय चलनसाठ्याच्या बाबतीत चीन जगात अव्वल स्थानावर आहे. चीनकडे तब्बल 3.751 ट्रिलियन डॉलरचा साठा असल्याचे सांगितले जाते. भारत, चीन आणि जपान निर्यात करून परकीय चलन मिळवतात.

Rupee vs Dollar | Sarkarnama

अर्थव्यवस्थेचा निकष

एखाद्या देशाची अर्थव्यवस्था किती सक्षम आहे, याचा मोठा अंदाज त्या देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे असलेल्या परकीय चलनसाठ्यावरून घेतला जातो. त्यामुळे परकीय चलनसाठा टिकवण्याचे सरकारपुढे आव्हान असते.

Rupee vs Dollar | Sarkarnama

डॉलर खर्च कुठे?

भारताच्या आयात खर्चात सर्वात मोठा वाटा कच्च्या तेलाचा आहे. भारत जवळपास 90 टक्के कच्चे तेल आयात करतो. 2025-26 आर्थिक वर्षात भारताची व्यापारी तूट 333.2 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली.

Rupee vs Dollar | Sarkarnama

पुढे काय होणार?

रुपयावरील दबाव, वाढती आयात आणि आखाती तणावामुळे आगामी काळात केंद्र सरकार आणखी कठोर आर्थिक उपाययोजना करू शकते. ऊर्जा बचत, निर्यात वाढ आणि आयात नियंत्रणावर सरकारचा भर राहण्याची शक्यता आहे.

Rupee vs Dollar | Sarkarnama

NEXT : 11व्या शतकातील चोलकालीन ताम्रपट...

येथे क्लिक करा :