Jagdish Patil
PM नरेंद्र मोदींनी काल आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत असलेल्या आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी देशवासीयांना मोठं आवाहन केलं.
यावेळी त्यांनी पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचं आणि पेट्रोल-डिझेल काटकसरीने वापरण्याचं आवाहन केलं.
मोदींनी सोने आयातीसाठी मोठ्या प्रमाणात डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात ज्याचा थेट परिणाम देशाच्या चलनसाठ्यावर होत असल्याचं सांगितलं.
भारत जगातील सर्वात मोठा सोने आयातदार देश असल्याने सरकारला सोने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च करावे लागतं.
जर लोकांनी काही काळासाठी सोने खरेदी कमी केली, तर भारत अब्जावधी डॉलरची परकीय चलन बचत करू शकतो, असं मोदी म्हणाले.
मोदींच्या याच आवाहनाच्या पार्श्वभूमीवर भारतात दरवर्षी सोन्याचं उत्पादन किती प्रमाणात होतं ते जाणून घेऊया.
याच वर्षी भाजप खासदार हेमंत विष्णु सावरा यांनी केंद्र सरकारला संसदेत सोने उत्पादना संदर्भात प्रश्न विचारला होता.
त्यावर सरकारने गेल्या 5 वर्षांत देशातील सोने उत्पादनात सातत्याने वाढ झाल्याची माहिती दिली.
सरकारी आकडेवारीनुसार, 2020-21 या वर्षात भारतात 1127 किलो सोने उत्पादन झाले. तर 2021-22 मध्ये ते 1407 किलोपर्यंत पोहोचले.
2022-23 मध्ये उत्पादनात किरकोळ वाढ होऊन तो आकडा 1433 किलो झाला. तर 2023-24 मध्ये 1586 किलोचं उत्पादन झालं.
तर 2024-25 मध्ये सोन्याचे उत्पादन 1627 किलो इतके झाली आहे.
जरी देशातील सोने उत्पादनात सातत्याने वाढ होत असली, तरी भारतातील सोन्याची मागणी त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे.