Jagdish Patil
'तमिळगा वेत्री कळघम' पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
विजय यांच्या नवीन सरकारचा शपथविधी सोहळा चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पार पडला.
राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते कलाकार उपस्थित होते.
विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्यांचे आई-वडील अत्यंत भावूक झाले.
विजय यांनी शपथविधी सोहळ्या दरम्यान राहुल गांधींचा हात हातात घेत उपस्थितांना अभिवादन केलं.
यावेळी राहुल गांधी आणि विजय या दोन्ही नेत्यांना सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही.
तर अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या उपस्थितीनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
विजय यांचा विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यापासून त्रिशा चांगलीच चर्चेच आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताल विजय यांनी मी भ्रष्टाचाराला कधीही थारा देणार नाही असं आश्वासन दिलं.